महिलांच्या प्रवासामुळं 'लोकल'प्रवाशांमध्ये लाखांची भर

कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (mumbai local) बंद ठेवण्यात आली होती. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव व चाकरमान्यांच्या समस्या लक्षात घेत राज्य सरकारनं लोकल (local) सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सुरूवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर बॅंकेचे कर्मचारी, मुंबईचे डबेवाले, वकील यांसारख्या अनेकांना परवानगी देण्यात आली. त्याशिवाय, यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या (navratri) पार्श्वभूमीवर महिलांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात आला. सरसकट महिलांना (women passenger) लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानं अवघ्या ७ दिवसांत मुंबई लोकलवरील प्रवासी संख्येत तब्बल १ लाख प्रवाशांची भर पडली आहे.

रेल्वेच्या मध्य, पश्चिम व हार्बर या तिन्ही मार्गावरून (central western harbour railway) रोज सुमारे ८ लाख प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळते. दुसरीकडं सर्वसामान्य पुरुषवर्गासह ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवासाची प्रतीक्षा कायम आहे. महिलांना लोकलप्रवासाची मुभा दिल्यानंतर रोज सरासरी ३५ ते ४० हजारानं प्रवासीसंख्येची भर नोंदवण्यात आली होती. दसऱ्यानंतर तिन्ही मार्गावरील (railway) प्रवासी संख्या वाढली आहे.

सध्या पश्चिम रेल्वेवर सुमारे ४.१० लाख आणि मध्य रेल्वेवर सुमारे ४ लाख प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. तिन्ही मार्गावर मिळून ८ लाखांहून अधिक प्रवाशांना तिकीट-पास घेण्यासाठी तिकीट खिडक्यांवरच अवलंबून राहावं लागत आहे. त्यामुळं अनेक स्थानकांत तिकीट खिडक्यावरील रांग वाढत असल्यानं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळं किमान यूटीएस अॅपचा वापर करण्याची मुभा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

लोकल प्रवासाची परवानगी नसल्यानं चाकरमान्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. परिणामी खिशाला कात्री लागत असून आर्थिक संकटाची चिंता त्यांना सतावत आहे. तसंच, रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळं अनेक ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अत्यंत जिकिरीचा झाला आहे. वैद्यकीय, तसंच आयुर्वेदिक उपचार किंवा अन्य कारणांसाठी ज्येष्ठांना प्रवास अनिवार्य आहे. अशातच लोकलसुविधा नसल्यानं खड्ड्यांमुळं अनेकांना पाठदुखीचा सामना करावा लागत आहे.


हेही वाचा - 

महिला प्रवाशांसाठी 'इतक्या' लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार?

TRP Scam: पाच गुंतवणूकदारांची होणार चौकशी


पुढील बातमी
इतर बातम्या