मुंबईतल्या 'या' ३ स्थानकांवर डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम कार्यरत, 'असा' होणार फायदा

दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवरही डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम कार्यरत होणार आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नावीन्यपूर्ण नॉन-फेअर महसूल कल्पना योजना (NINFRIS) अंतर्गत डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम (डिजीलॉकर्स) साठी कंत्राट दिले आहे.

रेल्वेतील हा पहिलाच प्रकल्प आहे, जो सुरक्षित लॉकर्स, डिजिटल पेमेंट सुविधा, आरएफआयडी टॅगचा वापर आणि ऑनलाईन पावती निर्मितीद्वारे सुधारित क्लॉकरूम सेवा प्रदान करतो. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, या डिजी क्लॉकमुळे प्रवाशांना त्यांचं सामान ठेवण्याबाबत सुरक्षितता आणि सोयीची अधिक चांगली व्यवस्था होणार आहे.

परवानाधारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉकर्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर स्थापित करणार आहे. सेवाशुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही, जे २४ तासांसाठी प्रति बॅग ३० रुपये आहे. प्रवासी सामानाच्या आकारानुसार लॉकर निवडू शकतात. ‘लॅडर २ राईज प्रायव्हेट लिमिटेड’ प्रवाशांना मदत करण्यासाठी २४ तास परिचालन सहाय्य प्रदान करेल.

वापरकर्त्यास युनिक बारकोडसह पावती मिळेल, जी बॅग पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरली जाईल. पूर्णपणे स्वयंचलित मशीनसाठी प्रवाशांच्या प्रवासाचा तपशील आणि आरपीएफकडून अनिवार्य स्कॅनिंग टॅग यासाठी आवश्यक असेल.

५ वर्षांच्या कालावधीत डिजिटल वैशिष्ट्यांसह या आधुनिक लॉकर्सच्या स्थापनेचा आणि संचालनाचा खर्च परवानाधारकाद्वारे पूर्णपणे केला जाईल. या स्थानकांवरील क्लॉकरूम ऑपरेशन्सदेखील आऊटसोर्स करून रेल्वेला ५ वर्षात ७९.६५ लाखांच्या नॉन-फेअर महसूल व्यतिरिक्त मनुष्यबळावरील खर्च वाचवण्यास मदत होणार आहे.


हेही वाचा

मुंबई लोकलच्या मासिक पासला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

विमान प्रवास महागला, 'असे' असतील नवे दर

पुढील बातमी
इतर बातम्या