दिव्यांग व्यक्तींसाठी 'बेस्ट' प्रवास

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुंबई – बेस्ट प्रशासनाने दिव्यांग व्यक्तिंसाठी मोफत बेस्ट प्रवास योजना आणली आहे. या योजनेला गुरूवारी, 20 आक्टोबरपासून सुरूवात होणार असल्यानं दिव्यांग व्यक्तिंसाठी बेस्टची ही दिवाळी भेट असणार असून त्यांचा प्रवास आता बेस्ट होणार आहे.

अशी आहे योजना

दृष्टीहीन आणि 40 टक्के वा त्यापेक्षा अधिक अस्थिव्यंग असणाऱ्यांच मिळणार योजनेचा लाभ

वातुनुकूलित बेस्ट बसगाड्या वगळता बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांतून मोफत प्रवास करता येणार

बेस्ट उपक्रमाचे स्मार्टकार्ड, ओळखपत्र बंधनकारक

नजीकच्या बेस्ट आगारातून जाऊन स्मार्टकार्ड-ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया करावी लागणार पूर्ण

इतर बातम्या