वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्याला आग

मध्य प्रदेशातील कुरवई केथोरा रेल्वे स्थानकावर भोपाळहून दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन टर्मिनलला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यात सोमवारी आग लागली.

मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

सर्व प्रवासी सुरक्षित असून आग विझवण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेन नवी दिल्लीतील निजामुद्दीनच्या दिशेने हबीबगंज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी कमलापती स्टेशनवरून निघाली तेव्हा एका डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याची माहिती मिळाली.

संपूर्ण तपासणीनंतर, सकाळी 10:05 च्या सुमारास ट्रेन रवाना करण्यात आली, असे भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“अग्निशमन दल वेळेवर घटनास्थळी पोहोचले आणि सकाळी 07:58 वाजता आग विझवण्यात आली,” एएनआयने रेल्वे अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले.

"आम्हाला राणी कमलापती स्टेशन ते हजरत निजामुद्दीन टर्मिनल (दिल्ली) कडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस 20171 च्या C-14 कोचच्या बॅटरी बॉक्समध्ये आग आणि धूर निघाल्याची माहिती मिळाली. ट्रेन कुरवई केथोरा (रेल्वे) येथे थांबवण्यात आली. अग्निशमन दलाने सकाळी ७:५८ वाजता आग विझवली," असे पश्चिम मध्य रेल्वेचे सीपीआरओ राहुल श्रीवास्तव यांनी सांगितले.

कोचमध्ये 20-22 प्रवासी होते आणि त्यांना तात्काळ इतर डब्यांमध्ये हलवण्यात आल्याचे पीटीआयने सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या