लोकलच्या प्रथम श्रेणी डब्याचे तिकीट होणार स्वस्त?

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकलच्या प्रथम श्रेणी डब्याचे तिकीट दर कमी करणार असल्याची शक्यता आहे. शिवाय याच डब्यातून परतीचा प्रवास (रिटर्न तिकीट) ही स्वस्त होणार असल्याची माहिती मिळते.

केंद्रीय रेल्वे मंत्रालय डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला प्रथम श्रेणी डब्याचे तिकीट दर कमी करण्यावर होकार देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तिकीट दर कमी केले तरी, रेल्वे पासाच्या रचनेत कोणातही बदल होणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही भाडे कपात राजकीय फायद्यासाठी केली जात आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार्‍या महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नात आहे. शिवाय, मुंबई सेंट्रल स्टेशनवर एक मोठा कार्यक्रमही आयोजित केला होता. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अनेक प्रमुख नेतेही उपस्थित होते.

प्रथम श्रेणीच्या डब्यांची तिकिटे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने अंतिम केलेल्या मेट्रो ट्रेनच्या बरोबरीची असतील. ते एसी ट्रेनच्या एकल प्रवास भाड्यांपेक्षा कमी असतील. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, प्रथम श्रेणीच्या डब्यांच्या किमती सुधारण्याबरोबरच त्यांनी एसी ट्रेनच्या तिकिटांच्या किमतीतही कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या