२९ जुलैपासून मुंबईहून हजसाठी थेट विमान!

हज यात्रेकरूंना थेट सौदी अरेबियाला घेऊन जाणारं विमान २९ जुलै रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडणार आहे. २९ जुलै ते १२ आॅगस्ट या कालावधीत हज यात्रेकरूंच्या सोईसाठी विमानं उडवण्यात येतील. मुंबईतून १४ हजार ६०० यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत.

आणखी कुठून विमानसेवा?

उड्डाणं सुरू झाल्यानंतर दररोज सरासरी ५ ते ६ विमानं यात्रेकरूंना सौदी अरेबियाला घेऊन जातील. मुंबईसोबत औरंगाबाद, नागपूर इथूनही हज यात्रेसाठी विमानं निघतील. औरंगाबाद इथून २९ ते ३१ जुलै दरम्यान तर नागपूर इथून २९ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीत हज यात्रेकरूंसाठी विमानांचं उड्डाण होईल.

यात्रेकरूंना थेट जेद्दाह सोडण्यात येईल. त्यांचा परतीचा प्रवास मदिना इथून सुरू होईल. परतीच्या प्रवासात मुंबईसाठी मदिना येथून १२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत विमानांची उड्डाणे होतील. तर नागपूरसाठी ११ ते १८ सप्टेंबर या कालावधीत उड्डाणे होतील. औरंगाबादसाठी १३ व १४ सप्टेंबर रोजी विमानांची उड्डाणे होतील.

पुढील बातमी
इतर बातम्या