मुंबईतील उड्डाणपूलं बेस्ट बससाठी खुली करण्याची 'या' संस्थेची मागणी

मुंबईतील वाहनांची गर्दी प्रचंड असून, या गर्दीतून बेस्ट बसला मार्ग काढणं अशक्य झालं आहे. महत्वाच्या रस्त्यांवर आणि गल्लोगल्लीत वाहनांच्या लांबच लांब रांग लागत आहेत. त्यामुळं या वाहतुक कोंडीतून बेस्ट बसची सुटका व्हावी अशी मागणी 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संस्थेच्या वतीनं केली जातं आहे. बेस्ट बस प्रवास जलद होण्यासाठी वांद्रे-वरळी सी-लिंक, वेस्टर्न एक्स्प्रेस वे, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, आदींसह शहरातील ५० उड्डाणपूल बेस्ट बससाठी खुले करावेत, अशी मागणी 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे.

बस सुधारणा

बेस्ट बस सुधारणा सुचविण्यासाठी 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संस्थेच्या वतीनं मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या जनसुनवाई अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी या संस्थेच्या वतीनं ही मागणी करण्यात आली. त्यामुळं आता मुंबईतील हे उड्डाणपूल बेस्ट बससाठी खुले होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा - 'या' कारणामुळे बेस्टने नाकारली ज्येष्ठांना बस सवलत

अनेक मागण्या

बेस्टच्या अर्थसंकल्पाचं पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करावं, बेस्ट वाहतुकीसाठी पालिकेनं अनुदान द्यावं, बस प्रवास जलद होण्यासाठी वेगळ्या मार्गिका उपलब्ध कराव्यात, नागरिकांना रुग्णालयांमध्ये पोहोचणं सुखकर व्हावं यासाठी रुग्णालयापर्यंत बस सेवा सुरू करावी, प्रवाशांच्या मागणीनुसार बेस्टचे नवीन मार्ग सुरू करावेत, बस फेऱ्यांची संख्या वाढवावी, नवीन बसची खरेदी करावी, यांसारख्या अनेक मागण्या संस्थेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा -

बनावट तिकीट तपासनीसाला दादर स्थानकात अटक

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार बच्चू कडू आक्रमक


पुढील बातमी
इतर बातम्या