गोरखपूर एक्स्प्रेस बिघाड : मध्य रेल्वे २०-२५ मिनिटे

मध्य रेल्वेवरील कसाऱ्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी गोरखपूर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. परिणामी, सकाळपासून मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वेचे (सीआर) मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी पीटीआयला सांगितले की, गोरखपूर-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील आटगाव स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाला, परंतु त्यांनी ट्रेनसाठी दुसऱ्या इंजिनची व्यवस्था केली.

पुढील बातमी
इतर बातम्या