पेंटाग्राफवर बेल्ट फेकला, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

हार्बर रेल्वेमार्गावरील मानखुर्द स्थानकाजवळ रेल्वेच्या पेंटाग्राफवर कुणीतरी कमरेचा बेल्ट फेकल्यानं वायर तुटून लोकल ठप्प झाली आहे. बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ओव्हरहेड वायर तुटल्यानं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे.

वाहतूक ठप्प

मानखुर्द स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळं मानखुर्द-पनवेल मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळं सीएसएमटीकडं जाणारी लोकल चेंबूरला थांबवण्यात आली होती.

दुरुस्तीचं काम सुरू

रेल्वे प्रशासनानं याची दखल घेतली असून, रेल्वेचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. तसंच, दुरुस्तीचं काम तातडीनं सुरु केलं आहे. दरम्यान, ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे हाल झाले आहेत. त्याशिवाय सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या काही लोकल गाड्याही रद्द झाल्यानं प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.


हेही वाचा -

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करा, विरोधकांची मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या