खासगी बसना मुंबईच्या प्रवेशद्वाराकडेच थांबा द्या- आदित्य ठाकरे

मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळं महत्वाच्या व छोट्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, प्रवाशांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं अनेकदा यावर उपाययोजना करूनही वाहतुककोंडी सुटत नसल्यानं पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी खासगी बसना मुंबईच्या प्रवेशद्वाराकडेच थांबा देण्याची सूचना गुरुवारी दिली आहे.

मुंबईतील आटोक्यात न येणाऱ्या वाहतूक कोंडीवरील उपायांसाठी नवनवीन पर्याय पुढे येत आहेत. याच गंभीर समस्येवर उपाय म्हणून खासगी बसना मुंबईच्या प्रवेशद्वाराकडेच थांबा देण्याची सूचना गुरुवारी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेत त्यांनी मुंबईतील समस्यांविषयी चर्चा केली.

मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ जकात नाके बंद झाल्याने रिक्त असलेल्या जागेचा वापर करण्याचाही समावेश आहे. त्यासाठी मुंबईत प्रवेश करणाऱ्या खासगी गाड्या प्रवेशद्वाराजवळ थांबा देण्याची सूचना आदित्य ठाकरे यांनी केली आहे. महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत भेट देऊन पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते.

खासगी बससाठी दहिसर, मुलुंड, वाशी आदी ठिकाणी येथे विशेष हब तयार करता येईल. त्या ठिकाणाहून खासगी बसमधील प्रवाशाना त्या ठिकाणाहून मुंबईत प्रवेश देताना बेस्ट बसचा वापर करण्याच्या सूचनेचाही समावेश आहे. त्यातून वाहतूक कोंडीचा प्रश्न कमी होतानाच बेस्टच्या महसुलात वाढ होईल, असे नमूद केले आहे आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडीसाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाचा पुनरुच्चार बैठकीत करण्यात आला. तसेच बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सल्लागार नेमण्याचा मुद्दाही उपस्थित झाला. बेस्टसंदर्भात आदित्य ठाकरे यांच्यासोबत पालिका आयुक्त, बेस्टचे महाव्यवस्थापक बागडे आणि बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्यासमवेतही बैठक झाली. त्यात 'एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन योजने'वरही चर्चा झाली.

पुढील बातमी
इतर बातम्या