मध्य रेल्वेवर ४ तासांचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्ये रेल्वे प्रशासनाने मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला आहे. विद्याविहार स्थानकातील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने शुक्रवारी मध्यरात्री ब्लॉक घोषित केला आहे.

पूल पाडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगादरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर हा ब्लॉक असणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत पूल पाडकाम सुरू राहणार आहे. यामुळे मेल-एक्स्प्रेसची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे विलंबाने होणार आहे. 

मेगाब्लॉकमुळे काही एक्स्प्रेसच्या वेळेत बदल होणार आहे. १२८७९ एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस रात्री १२.१५ ऐवजी पहाटे ०४.३० वाजता सुटणार आहे. तर १२१६७ एलटीटी-मांडुवाडी ही एक्सप्रेस रात्री १२.३५ ऐवजी पहाटे ५ वाजता रवाना होणार आहे. ११०९९ एलटीटी-मडगाव डबल डेकर मध्यरात्री ०१.१० ऐवजी पहाटे ५.१० ला मार्गस्थ होणार आहे.


हेही वाचा -

मुंबईचं कमाल तापमान एका महिन्यात २ वेळा ३८ अंशावर

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांची नोटीस


पुढील बातमी
इतर बातम्या