मध्य रेल्वेवर नऊ तासांचा मेगा ब्लॉक

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुंबई - ऐन दिवाळी तोंडावर आलेली असताना मेगा ब्लॉक घेतल्याने रविवारी प्रवाशांचे हाल होणार हे स्पष्ट झालंय, शेवटच्या क्षणी हा ब्लॉक जाहीर केल्याने प्रवाशांच्या नाराजीत भरच पडणार आहे.

रविवारी मध्य रेल्वेवर तब्बल ९ तासांचा हा मेगा ब्लोक जाहीर करण्यात आला असून दिवा स्थानकातील फास्ट ट्रॅकचं काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतल्याचं सांगितलं जातंय, यावेळी सीएसटीकडे जाणाऱ्या सर्व जलद गाड्या या कल्याण ते ठाण्यादरम्यान स्लो ट्रेकवर वळवण्यात आल्या. सकाळी ९ पासून ते संध्याकाळी सहावाजेपर्यंत हा ब्लॉक कायम राहील, या ब्लॉकचा परिणाम लोकलच्या सेवेवर तर पडेलच, शिवाय एक्स्प्रेस टर्नचं वेळापत्र देखील कोलमडले आहे. या वेळी लोकलची सेवा ही १५ ते २० मिनटं उशिरानं धावत असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. याला ब्लॉकमुळे रत्नागिरी - दादर पॅसेंजरचा शेवटचं स्थानक पनवेल असेल तर त्यानंतर ती गाडी पानवेलवरूनच सुटेल.

हार्बर लाईनवर देखील ब्लॉक घेण्यात आला असून यादरम्यान चुनाभट्टी आणि माहीम ते सीएसटीदरम्यान दोन्ही मार्गावरील सेवा ही पूर्णपणे बंद आहे, सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी सुरु होणारा हा ब्लॉक ४ वाजून ४० पर्यंत चालेल. या दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहें

पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक ठेवण्यात आलेला नाही. शनिवार आणि रविवारी रात्रीच रेल्वेनं सगळी काम उरकल्यानं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या