रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी 23 एप्रिलला मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्टेशनदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान, माटुंगा ते मुलुंड मार्गावरील डाऊन धीमी वाहतूक डाऊन जलद मार्गावर चालवली जाईल. त्यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्टेशनवर लोकल थांबणार नाहीत.

सीएसटीहून डाऊन जलद मार्गावर सुटणार्‍या सर्व लोकल गाड्या सकाळी 10.48 ते दुपारी 2.42 वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्टेशनवर थांबतील. तसंच सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सीएसटी जाणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल उशिराने धावतील. हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहिम स्टेशनदम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊनवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 11.21 ते दुपारी 4.43 वाजेपर्यत बंद राहणार आहे. तर सीएसटी ते कुर्ला आणि सीएसटी ते वांद्रे या दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असेल. हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी कुर्ला स्टेशनवरील प्लॅटफार्म क्र. 8 वरुन पनवेलसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या