होळीनिमित्त एसटीच्या जादा बस

होळी निमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देत एस.टी. महामंडळाने अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १७ मार्च ते २४ मार्च या कालावधीत मुंबईतून तसंच कोकणातील विविध बस स्थानकांतून या बस सोडल्या जातील.

गर्दीमुळे अतिरिक्त बस

१०वी आणि १२वी च्या परीक्षा या कालावधीत संपत असल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा होळीच्या सणाला गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केलं आहे. २० मार्चला होळीचा सण आहे. कोकणवासीयांना गणपती उत्सवानंतर होळीच्या सणाची प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत.

कुठून सोडणार बस?

१७ मार्च पासून मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला नेहरूनगर या बस स्थानकातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त १००% ग्रुप बुकिंगच्या बसेस, प्रवांशांच्या सोयीसाठी त्यांच्या इच्छित स्थळापासून देण्यात येत आहेत. तसंच आरक्षणाच्या बसेस या नियोजित बसस्थानकातून सुटतील. या सर्व बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून public.msrtcorg.com या संकेतस्थळावरून, तसंच एसटी महामंडळाच्या अॅपद्वारे प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित करता येणार आहे.


हेही वाचा - 

महापालिका मुंबईत उभारणार डबेवाला भवन!

प्रा. वामन केंद्रे, शंकर महादेवन, कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री प्रदान


पुढील बातमी
इतर बातम्या