वाहतूक कोडींतून मुंबईकराची सुटका करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ई-दुचाकी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी अॅपच्या सहाय्याने अंधेरी पूर्व येथे ई-दुचाकी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ही सुविधा अंधेरीतील अन्य भागांत सुरू करण्यात येणार आहे.
बेस्ट बसमधून प्रवासी उतरताच त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहतुकीचा नवीन पर्याय बेस्टने उपलब्ध केला आहे. त्यासाठी प्रथमच इलेक्ट्रिक दुचाकी सेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई-बाईक सेवेसाठी Vogo अॅप डाउनलोड करणे आणि त्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-बाईकचे भाडे अत्यंत क्षुल्लक आहे.
बेस्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या ई-दुचाकीचा वेग प्रतितास २५ किमी असेल. किमान तीन किलोमीटर प्रवासासाठी मूळ भाडे २० रुपये एवढे राहील. त्यानंतर दीड रुपया प्रति मिनिट भाडे आकारले जाईल. वोगो अॅपच्या सहाय्याने ही सेवा दिली जाणार आहे.
पुढच्या कालावधीत ही सेवा बेस्टच्या 'चलो' अॅपमधूनही उपलब्ध होऊ शकते. त्याचप्रमाणे, बेस्टचे बसपासधारक आणि सुपर सेव्हर योजनेत सहभागी झालेले प्रवासीही दुचाकीसेवा वापरू शकतात.
सध्या सुरू असणारी सेवा
हेही वाचा