मुंबई मेट्रोचे तिकीट आता व्हॉट्सअॅपवरून बुक करता येणार, कसे ते वाचा

WhatsApp हे आता काही इन्स्टंट मेसेजिंग App राहिलेले नाही. यामध्ये अनेक फीचर्स आहेत जे फारच उपयुक्त आहेत. तसंच आणखी एक फीचर WhatsApp घेऊन आलं आहे. ते म्हणजे मेट्रो तिकिट. यापुढे मेट्रो तिकिट (Mumbai Metro ticket) खरेदी करण्यासाठी आपण WhatsApp चाही वापर करू शकता. (metro ticket on whatsapp)

WhatsApp ची सुरुवात इन्स्टंट मेसेजिंग App म्हणून झाली होती. मात्र यामध्ये हळूहळू नवनवीन फीचर्स आले. आता तुम्ही WhatsApp मध्ये ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग आणि आता पेमेंट फीचर देखील वापरू शकता. अलीकडेच या अ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही मेट्रो तिकिट खरेदी करू शकता.

“नेहमीच घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या शहराला आता कशासाठीही थांबण्याची गरज नाही. तिकीटासाठीही नाही.”असे ट्विट मेट्रोने केले आहे. ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी कशाप्रकारे तिकिट बुक करता येते हे दाखवले आहे.

व्हॉट्सअॅपद्वारे मेट्रो तिकीट कसे बुक कराल?

  • तुम्ही ही सेवा इतर कोणत्याही WhatsApp चॅटबॉट सेवेप्रमाणे वापरू शकता.
  • 967000-8889 या WhatsApp क्रमांकावर मेसेजवर Hi पाठवा.
  • मुंबई मेट्रो ई-तिकीटिंगने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • ड्रॉप-डाउन मेनूमधून, तुमचा स्रोत आणि गंतव्य स्थाने निवडा.
  • तुम्हाला हव्या असलेल्या तिकिटांची संख्या निवडा आणि ती सिंगल आहेत की रिटर्न ते निवडा.
  • क्रेडिट कार्ड किंवा UPI सारख्या तुमच्या पसंतीच्या पेमेंट पद्धतीसह ऑनलाइन पेमेंट करा.

20 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रो लाईन्स 2A आणि 7 चे उद्घाटन केले. लाईन 2A अंधेरी पश्चिमेतील दहिसर पूर्व ते DN नगर पर्यंत जाते, तर लाइन 7 अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्वला जोडते.


हेही वाचा

मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे पूर्ण वेळापत्रक जाहीर

वंदे मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार, कमी असेल भाडे

पुढील बातमी
इतर बातम्या