देशातील 'टॉप 10 स्वच्छ रेल्वे स्थानकांत' मुंबई नाहीच

रेल्वे प्रशासनाने स्वच्छ भारत अतंर्गत प्रत्येक ठिकणी स्वच्छता मेहिमा राबवल्या. त्यापुढील पाऊल उचलत रेल्वे मंत्रालयाने बुधवारी देशातील टॉप 10 स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील पुणे या एकमेव स्थानकाला स्थान मिळाले असून पयर्टकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मुंबईतील एकही स्थानक या यादीत स्थान मिळवू शकले नाही. पुणे स्थानक या यादीत नवव्या क्रमांकावर आहे.

गेल्यावर्षी मुंबई सेंट्रल स्थानकाचा टॉप टेन यादीत पहिल्या पाच स्थानकांत समावेश झाला होता. यंदा मात्र मुंबईतील एकाही स्थानकाचा स्वच्छ स्थानकांत समावेश झालेला नसल्याने मुंबई उपनगरीय स्थानकांच्या स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाल्याचे उघड झाले आहे.

टॉप 10 रेल्वे स्थानकं
1) विशाखापट्टणम
2) सिकंदराबाद जंक्शन
3) जम्मू तावी
4) विजयवाडा
5) आनंद विहार टर्मिनल
6) लखनऊ जंक्शन
7) अहमदाबाद
8) जयपूर
9) पुणे जंक्शन
10) बंगळुरु सिटी

पुढील बातमी
इतर बातम्या