गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड, रेल्वे वाहतूक उशीरानं

गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरू आहे. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्यानं पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यात आल्याची माहिती सध्या मिळते. मात्र, बिघाड दुरुस्त झाला असला तरी लोकल १५ ते २० मिनिटं उशीरानं धावत आहेत.

सिग्नल यंत्रणेत बिघाड

गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोरेगाव स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळं या बिघाडाचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त केल्याची माहिती मिळते.

प्रवाशांची गर्दी

पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड सकाळी ऐन गर्दीच्या वेळी झाल्यानं स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यामुळं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यास उशीर झाला आहे.


हेही वाचा -

यंदाचा विश्वचषक आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक - विराट कोहली


पुढील बातमी
इतर बातम्या