शनिवारी मध्यरात्री ठाणे-दिव्यादरम्यान नाईट ब्लॉक

शनिवारी मध्यरात्री ठाणे आणि दिव्यादरम्यान नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ४ तासांचा असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकातील रोडक्रेनद्वारे जुन्या पादचारी पुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे.

ठाणे-दिव्यादरम्यान ब्लॉक

हा ट्रॅफिक ब्लॉक चार तासांचा असून ठाणे ते दिवादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी मध्यरात्री १.४५ ते रविवारी पहाटे ५.४५ वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या