ओला, उबर चालक मालकांचा संप अखेर मागे

मागील १२ दिवसांपासून ओला, उबरच्या चालक-मालकांनी पुकारलेला संप अखेर तेराव्या दिवशी मागे घेण्यात आला. आपल्या विविध मागण्यांसाठी २२ ऑक्टोबरपासून सुरू केलेला हा संप अखेर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला.

अखेर संपाला स्थागिती

गुरुवारी दुपारी अॅप बेस्ड टॅक्सी असलेल्या ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चालक-मालकांची चर्चा होणार होती. परंतु, या चर्चेपूर्वीच ओला-उबर व्यवस्थापनानं पळ काढल्याने चर्चा होऊ शकली नाही. मात्र, शुक्रवारी मंत्रालयात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये यावर तोडगा काढण्यात आल्याने चालक-मालकांनी संप स्थागित केला आहे.

दिवाळी असल्यामुळे चालकांना इन्सेटिव्ह देण्यात येणार आहे. त्यानंतर १५ नोव्हेबरपर्यंत कंपन्या काय भूमिका घेणार यावर संपाच भवितव्य ठरणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या