MSRTC Strike Row: 'इतके' एसटी कर्मचारी कामावर परतले

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एकूण १५,१८५ अतिरिक्त संपकरी कर्मचारी सोमवारी, १८ एप्रिल रोजी पुन्हा कामावर रुजू झाले. संप सुरू झाल्यापासून संपावर असलेल्या ९०,००० कर्मचाऱ्यांपैकी ६१,६४७ कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम सुरू केले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबई उच्च न्यायालयानं एमएसआरटीसीनं कामगार संघटना आणि इतरांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर निकाल दिला होता. न्यायालयानं म्हटलं होतं की, कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत पुन्हा काम सुरू करण्यास सांगितलं होतं.

या व्यतिरिक्त, काम पुन्हा सुरू झाल्यावर संपावर असलेल्यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारला कोणतीही कारवाई करू नये असं सांगितलं. तसंच यापूर्वी करण्यात आलेली कारवाई देखील मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायपालिकेच्या आदेशानंतर एकूण २५,००० नवीन कर्मचारी कसे परत आले आणि ड्युटीवर असलेल्यांची एकूण संख्या ६१,६४७ वर पोहोचली याबद्दल एका अधिकाऱ्यानं माहिती दिली. MSRTC बस सेवा पूर्ण सुरू झाल्याचं या  अधिकाऱ्यानं सूचित केलं.


हेही वाचा

बेस्टमध्ये टॅप-इन/टॅप-आउट तिकीट सेवा 'या' आठवड्यापासून होणार सुरू

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मेट्रोचं तिकीट, ‘या’ नंबरवर करा मेसेज

पुढील बातमी
इतर बातम्या