पश्चिम रेल्वेवरील पुलांच्या कामासाठी ४५ कोटी

पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागातील रेल्वेवरील पुलांच्या कामासाठी ४५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई रेल्वेवरील अनेक पुलांचे आयुर्मान पूर्ण झालेले असून देखील ते वापरात आहेत. यामुळे अनेक पुलांच्या देखभाल, दुरूस्तीकरण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या निधींतर्गत देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रँट रोड, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, विरार-वैतरणा या उड्डाणपुलांचा समावेश आला आहे. शिवाय ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल (दक्षिण), महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी या स्थानक परिसरातील रेल्वेपुलांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीमुळे पुलांच्या कामांना वेग येईल.

रेल्वे मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार पश्चिम रेल्वेवरील रोड ओव्हर ब्रीज आणि रोड अंडर ब्रीज उभारणीसाठी एकूण ६०५ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती मिळते.

पुढील बातमी
इतर बातम्या