नायगाव स्टेशनवर शनिवारी सकाळी प्रवाशांच्या रागाचा उद्रेक झाला आणि संतप्त प्रवाशांनी रेल-रोको करण्याचा निर्णय घेतला. कारण होतं सकाळी 7.43ची वसई-अंधेरी रद्द केलेली लोकल..नव्या वेळापत्रकाप्रमाणे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पण, याची कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना रेल्वे प्रवाशांना देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. आणि प्रवाशांनी रेल रोको करण्याचा निर्णय प्रवाशांनी घेतला.
आधीच ट्रेन रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच रेल रोको केल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तब्बल अर्धा तास ही परिस्थिती जैसे थे च होती. प्रवाशांनी थेट रुळावर उतरुन आपला संताप व्यक्त केला.
त्यानंतर, रेल्वे प्रशासनाकडून संतापलेल्या प्रवाशांची मनधरणी करण्यात आली. प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले. रेलरोकोमुळे सकाळी कामावर निघालेल्या आणि ऑफिस गाठण्याच्या घाईत असणाऱ्या वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, रेलरोकची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर प्रवाशांना ट्रॅकवरून हटवण्यात आलं.
हेही वाचा