मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३१ जानेवारीला ब्लाॅक, दर तासाला वाहतूक बंद

  • मुंबई लाइव्ह नेटवर्क & मंगल हनवते
  • परिवहन

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यात अनेकांचे बळीही गेले आहेत. त्यामुळे दरडी कोसळण्याच्या या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढण्याचं काम हाती घेतलं आहे.

दरड काढून बसवणार जाळ्या

दरडी काढून त्यावर जाळ्या बसवण्यात येणार आहेत. त्यानुसार दरडी काढण्याचं काम बुधवारी ३१ जानेवारीला करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वेच्या धर्तीवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे. दरड काढण्याचं काम सुरू असताना जिथे काम सुरू आहे, तेथील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

द्रुतगती मार्गावर होणार कोंडी

एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्यात द्रुतगती मार्गावरील वाहतूक निश्चित वेळेसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. साधारणत: पंधरा मिनिटांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील या ब्लाॅकमुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे बुधवारी खूपच महत्त्वाचं काम असेल तरच द्रुतगती मार्गावरून प्रवास करा.

या वेळेत असेल ब्लाॅक...

आडोशी बोगदा (पुण्याच्या दिशेने)

ब्लॉक

वाहतूक सुरू

सकाळी १० ते १०.१५

सकाळी १०.१५ ते ११

सकाळी ११ ते ११.१५

सकाळी ११.१५ ते १२

दुपारी १२ ते १२.३०

दुपारी १२.३० ते २

दुपारी २ ते २.१५

दुपारी २.१५ ते ३.००

दुपारी ३ ते ३.१५

वाहतूक पूर्ववत

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या