एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेवर प्रवासी नाराज

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि डिजिटायझेशनकडं कूच करण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना काढली. तसंच, एसटीच्या सवलतींसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या स्मार्ट कार्ड योजनेच्या नियोजनामुळं एसटीच्या ज्येष्ठ प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. मुंबईतील अनेकांना स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी आगाराला फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळं एसटीच्या कारभारावर ज्येष्ठ प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

स्मार्ट कार्डसाठी नोंदणी

राज्यभरातील एसटीच्या आगारातून तब्बल १७ लाख प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. स्मार्ट कार्डची नोंदणी होऊनदेखील स्मार्ट कार्ड मिळाले नाही. तब्बल १५ लाखांवर ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. एसटीच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ केला. ही स्मार्ट कार्ड योजना महाराष्ट्रातील १७ लाख प्रवाशांपर्यंत पोहोचली आहे.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात होण्याची शक्यता

सुट्ट्या पैशांसाठी वाद

एसटीच्या ३१ विभाग आणि २५० डेपोमधून प्रवाशांनी स्मार्ट कार्डची नोंदणी केली आहे. एसटी प्रवासात वाहक आणि प्रवासी यांचा सुट्टे पैशांसाठी नेहमी वाद होत असत. त्यामुळं हा वाद मिटविण्यासाठी एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली. मात्र, या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, सवलतधारी प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं आहे. तसंच, नोंदणी केल्यानंतरही स्मार्ट कार्ड मिळत नसल्यानं प्रवाशांच्या राज्यभरातील प्रत्येक आगारात फेऱ्या माराव्या लागत आहेत.


हेही वाचा -

एसटीनं आता रात्रीचा प्रवास होणार आणखी सुखकर

'हा' उन्नत मार्ग कोणत्याही समारंभाविना वाहतुकीस खुला


पुढील बातमी
इतर बातम्या