गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तोटा सहन करणारी बेस्ट आता आणखीनच तोट्याच चालली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सलग पाचवा दिवस असून बेस्टला १२ कोटीचं नुकसान झालं आहे. तसंच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यामधील वेतनकराराची मागणी मान्य झाल्यास बेस्टला तब्बल ५४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळं या रकमेची भरपाई करण्यासाठी जादा भाडे आकारण्याचा प्रस्तवा ठेवण्यात आला आहे.
बेस्ट उपक्रमानं तयार केलेल्या प्रस्तावानुसार, बेस्ट भाड्यात ४ ते २३ रुपयांपर्यंतची वाढ सुचवण्यात आली आहे. सध्या दोन किलोमीटर प्रवासासाठी ८ रुपये भाडं आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास दोन किलोमीटरसाठी १२ रुपये भाडं आकारलं जाऊ शकतं.
प्रवासी संख्येत घट
भाडं वाढवण्याच्या प्रस्तावामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट होण्याची शक्यता आहे. बेस्टनं दररोज २५ ते ३० लाख प्रवासी प्रवास करत असून ३ कोटींचा महसूल प्राप्त होतो. त्यामुळं जादा भाडेवाढ झाली तर ही संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा