M-Indicator अॅपमध्ये समजणार लोकलची निश्चित वेळ

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लोकलच्या वेळापत्रकाबाबत माहिती देणाऱ्या ‘m-Indicator' या अॅपमध्ये लोकलची कोणत्या स्थानकात कधी पोहोचणार आणि कोणत्या स्थानकातून सूटली याची निश्चित वेळ समजणार आहे. तसंच, लोकल स्थानकात आल्यावर तुम्ही लोकलमध्ये चढलात का असं विचारण्यात येत. त्यावेळी ‘OK’ केल्यावर तुम्हाला पुढील स्थानक कोणतं याबाबत माहिती दिली जाते

रियल टाईम स्टेटस

या अॅपमध्ये लोकलच्या रियल टाईम स्टेटसबाबत माहिती दिली जात आहे. त्यामुळं लोकल कोणत्या स्थानकात आहे आणि एखाद्या स्थानकात पोहोचायला किती वेळ लागणार आहे, हे समजण्यात मदत होणार आहे. तसंच, या अॅपच्या द्वारे लोकल किती उशिरानं येणार आहे, याबाबतही माहिती दिली जात आहे.

'm-Indicator'च्या मते या अॅपच्या माध्यमातून कोणती लोकल पकडली याबाबत माहिती मिळणार आहे. तसंच, हे अॅप लोकलमध्ये चढल्यावर आणि उतरल्यावर काम करणार नाही.


हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: मध्य रेल्वेच्या २० विशेष लोकल

मुंबईत ८ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या