मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ट्रेनमधून व्हिस्टाडोम डबे हटवले, 'या' एक्स्प्रेसचा समावेश

पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल ट्रेनमधून व्हिस्टाडोम डबे हटवण्याची घोषणा केली आहे, ज्यात डबल डेकर एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 12931/12932) आणि कर्णावती एक्स्प्रेस (गाडी क्र. 12933/12934) यांचा समावेश आहे.

मंगळवारी लागू झालेल्या या निर्णयामुळे प्रवाशांची निराशा झाली आहे. व्हिस्टाडोमला कमी प्रतिसाद मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

विहंगम दृश्य देणारे रेक यापुढे डबल डेकर एक्स्प्रेस आणि कर्णावती एक्स्प्रेसचा भाग असणार नाहीत. 

सोशल मीडियावर प्रवासी विशाल फिरके यांनी विस्टाडोम डबे हटवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एक अविस्मरणीय प्रवास देणाऱ्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे या रेकने प्रवाशांमध्ये लोकप्रियता मिळवली होती. डबे हटवण्याचा निर्णय तात्पुरता आहे की कायमचा हे अनिश्चित आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या