मुंबई ते बाली समुद्रप्रवास लवकरच

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • परिवहन

मुंबईहून इंडोनेशियाला समुद्रमार्गे जाण्याच्या विचारात असाल तर ते आता शक्य होणार आहे. कारण कोची आणि अंदमान-निकोबार बेटांमार्गे क्रूझने बालीपर्यंत प्रवास करता येणार आहे.

नितीन गडकरींची माहिती

मुंबई-बाली क्रूझबाबत काम सुरू असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गोव्यातल्या पणजीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

क्रूझ टुरिझम वाढवण्याचा उद्देश

'भारतातून बालीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. पण आता त्यांना मुंबईहून क्रूझने प्रवास करणे शक्य होणार आहे. याशिवाय पर्यटनालाही चालना मिळेल. आपल्या देशातून एक लाख नागरिक सिंगापूरला क्रूझने जातात. क्रूझ टुरिझम वाढवणं हा उद्देश असल्याचं गडकरींनी सांगितलं.

हवाई वाहतूक नियंत्रण प्राधिकरणाकडून सी प्लेनबाबत नियमावली आखण्यात आली आहे. जूनच्या महिन्याअखेरपर्यंत अंतिम निर्णय होईल, असंही गडकरींनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या