मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकावर लोकलला अाग लागण्याची घटना घडली. विरार - डहाणू या लोकलला शाॅट सर्किटमुळे ही अाग लागली. अाग अाटोक्यात अाली असून सुदैवाने यामध्ये कसलीही जीवीतहानी झाली नाही.
विरार स्थानकावर प्लॅटफाॅम ४ वर विरार - डहाणू लोकल उभी होती. यावेळी अचानक शाॅट सर्किट होऊन लोकलला मोठी अाग लागली. अाग दिसताच लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांनी उड्या मारून पळण्यास सुरूवात केली. प्रवासी जीव मुठीत धरून पळत होते. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. विरार स्थानकावर यापूर्वीही अागीच्या घटना घडल्या अाहेत. २०१६ मध्ये याच प्लॅटफाॅमवर अाग लागली होती.
हेही वाचा -
उपनगरातील ४४५ पुलांचं आयआयटी करणार आॅडिट - रेल्वेमंत्री
अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना ५ लाखांचं बक्षीस