आयुष्यात एकदा तरी परदेशवारी करावी, अशी प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा असते. अर्थात प्रत्येकाचं हे सप्न साकार होतंच असं नाही, पण पश्चिम रेल्वेने अापल्या ताफ्यातील ५२ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं हे स्प्न साकार करत त्यांना चक्क थायलंडमध्ये पर्यटनासाठी पाठवलं आहे.
या कर्मचाऱ्यांमध्ये गँगमन, ट्रॅकमन आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. हे कर्मचारी शनिवारी थायलंडमध्ये पर्यटनासाठी रवाना झाले असून ५ दिवसांनतर पुन्हा मायदेशात परतणार आहेत.
या परदेशवारीसाठी पश्चिम रेल्वेने 'थॉमस अँण्ड कूक' या यात्रा कंपनीशी करार केला आहे. या करारनुसार अत्यंत खडतर परिस्थितीत लोकलच्या देखभालीचं आणि दुरुस्तीचं काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात परदेश सहल उपलब्ध करून देण्यात आली आहे. थायलंडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये २० महिला, २८ पुरुष कर्मचारी आणि ४ टूअर कॉर्डिनेटर यांचा समावेश आहे.
सहलीच्या एकूण खर्चापैकी केवळ ३३ टक्के रक्कम या कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. कर्मचारी कल्याण निधीतून या थायलंड सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना टी-शर्ट, टोप्या आणि ट्रॉली बॅग देऊन थायलंडला रवाना करण्यात आलं आहे.
हेही वाचा-
वर्सोवा पूल अवजड वाहतुकीस महिनाभर बंद
मस्जिद स्थानकाजवळील पादचारी पुलावर लवकरच हातोडा