पश्चिम रेल्वेवरील 'या' स्थानकांना मिळणार नवा साज

पश्चिम रेल्वे मार्गावरील ग्रॅण्ट रोड, चर्नीरोड व मरिन लाइन्स स्थानकाला नवा साज मिळणार आहे. या ऐतिहासिक स्थानकांच्या संवर्धन व जपणूक करण्यासाठी विविध कामं हाती घेण्यात येणार आहेत. या स्थानकांच्या नुतणीकरणाची कामं २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या स्थानकांच्या नुतणीकरणाचं काम २ टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्रॅण्ट रोड, चर्नीरोड स्थानकांच्या नुतणीकरणाचं काम केलं जाणार आहे. तसंच, दुसऱ्या टप्प्यात मरिन लाईन्स स्थानकाच्या नुतणीकरणाचं काम केलं जाणार आहे.

दुरूस्ती काम

पश्चिम रेल्वे मार्गावरील ग्रॅण्ट रोड व चर्नीरोड स्थानकाच्या नुतणीकरणाच्या कामासाठी अंदाजित ५.३१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर मरिन लाईन स्थानकाच्या नुतणीकरणासाठी ३.७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या स्थानकांच्या नुतणीकरणावेळी स्थानकातील इतर वस्तूचंही नुतणीकरण केलं जाणार आहे. नव्या वास्तूविशारदानुसार चहाचे स्टॉल, प्रसाधनगृह दुरूस्त केले जाणार असून, स्थानकावर रंगरंगोटीही करण्यात येणार आहे.

स्थानकाचं बांधकाम

ग्रॅण्ट रोड स्थानकाचं बांधकाम १८५९ साली करण्यात आलं होतं. तसंच, चर्नी रोड स्थानकाचं बांधकाम १८७८ साली करण्यात आलं होतं. ग्रॅण्ट रोड स्थानकातून दरदिवसाला ७७ हजार ३४५ प्रवासी प्रवास करतात तर, चर्नी रोड स्थानकातून ५१ हजार ८५५ प्रवासी प्रवास करतात. या स्थानकातली पूलांसह इमारतीची दुरूस्ती केली जाणार आहे.


हेही वाचा -

मुंबईत पूर येणार की नाही, हे आधीच कळणार!

साध्या लोकललाही स्वयंचलित दरवाजे, पश्चिम रेल्वेचा निर्णय


पुढील बातमी
इतर बातम्या