आता एसी लोकलचा थांबा होणार कमी!

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलचा थांब्याची वेळ आता कमी करण्यात येणार आहे. कारण ही लोकल स्थानकात आल्यानंतर दरवाजा उघडण्यापासून ते प्रवासी डब्यात चढल्यानंतर दरवाजा बंद होण्यासाठी १ मिनिटांचा वेळ लागतो. याचा परिणाम इतर लोकलच्या फेऱ्यांत होतो. त्यामुळे एसी लोकलच्या थांब्याची वेळ कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

३० सेकंदाचा थांबा?

वातानुकूलित मेट्रोमध्ये दरवाजा उघड-बंद प्रक्रिया फक्त ३० सेकंदांत पूर्ण होते. यामुळे मेट्रोच्या धर्तीवर एसी लोकल दरवाजांच्या उघड-बंद प्रक्रियेता वेग वाढवणे गरजेचं असल्याची सूचना रेल्वे महाव्यवस्थापकांनी चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीला (आयसीएफ) केली आहेत.

रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा पुढाकार

एसी लोकलमधील दरवाजा उघड-बंद करण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी पुढाकार घेतला आहे. यामुळे वातानुकूलित लोकल दरवाजाच्या समस्येतून लवकरच प्रवाशांची सुटका होणार आहे.

आयसीएफमध्ये एसी लोकल बांधणीचं काम सुरू असून जानेवारी २०१९ पर्यंत नवीन वातानुकूलित लोकल दाखल होणार असून या लोकलमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेत योग्य ते बदल करणार असल्याचं रेल्वे महाव्यवस्थापक गुप्ता यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या