जीव वाचवण्यासाठी मुंबईकरांना 'एक मिनिट ब्रेक'

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुंबई - रेल्वे स्थानकांवरील अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे प्रवासी सुरक्षित रहावेत, यासाठी पश्चिम रेल्वे सामाजिक जागरूकता अभियान राबवणार आहे. 16 फेब्रुवारीला 'एक मिनिट ब्रेक' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर 'जिंदा है' या कार्यक्रमासाठी 20 महाविद्यालयांतील विद्यार्थी 16 तारखेला चर्चगेट स्थानकावर १ मिनट ब्रेक घेऊन सामाजिक जागरूकता करणार आहेत. रेल्वेने प्रवास करण्यासाठी सतत प्रवासी धावपळ करतात. त्यांना एक मिनिट तरी शांतता मिळावी, या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती 'परे'चे महाव्यवस्थापक जी.जी. अग्रवाल यांनी दिली.

रोज किमान 74 लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. त्यात कित्येक जणांचा जीव जातो तर अनेक जण जखमी देखील होत असतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेने रूळ ओलांडणाऱ्या आणि असुरक्षित प्रवास करणाऱ्यांमध्ये जनजागृति व्हावी यासाठी या सामाजिक जागरूकता अभियानाचे आयोजन केले आहे. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या