मुंबई - बाहुबली 2’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केल्यानंतर दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी चाहत्यांसाठी सिनेमाच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. सहा मिनिटांचा हा व्हिडीओ ‘बाहुबली’च्या ट्विटर हँडल, यू ट्यूब अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राजमौली, देवसेना, भल्लाल देव, कटप्पा आणि बाहुबली यांच्या भूमिका साकारणारे कलाकार चाहत्यांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ काही तासातच चक्क दीड लाखाहून अधिक जणांकडून पाहिला गेलाय. यावरूनच बाहुबली २ ची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिल्याचं समजतं.
प्रभास, राणा डग्गुबती, तमन्ना, अनुष्का शेट्टी आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बाहुबली - द कन्क्लुजन’ 28 एप्रिल, 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी ‘कटप्पानं बाहुबलीला का मारलं?’ या बहुप्रतिक्षीत प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.