मालाडमधील 'व्ही. डी. इंडियन फॉर मेंटली सोसायटी चाइल्ड' या संस्थेत शिकणाऱ्या गतीमंद मुलांनी यंदा बाप्पासाठी खास चॉकलटचे मोदक तयार केले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान ही मुले नवनवीन आविष्कार करत असतात. 10 हजार किलो चॉकलेट मोदकांच्या विक्रीसाठी यंदा एन एम कॉलेज आणि संघवी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हातभार लावला. तसेच सामाजिक संस्था, महापालिका प्रदर्शनाच्या माध्यमातून या मुलांनी तयार केलेले उत्पादन लोकांपर्यंत पोहचवण्यात आले.