Advertisement

बेरोजगारीचा उच्चांक, लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये ७५ लाख लोकांनी गमावल्या नोकऱ्या

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)या संस्थेने सोमवारी याबद्दलची माहिती दिली.

बेरोजगारीचा उच्चांक, लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये ७५ लाख लोकांनी गमावल्या नोकऱ्या
SHARES

महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांत स्थानिक पातळीवर कडक निर्बंध आणि लॉकडाउन (Lockdown in Maharashtra continues)लादण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे ७५ लाखांहून अधिक नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)या संस्थेने सोमवारी याबद्दलची माहिती दिली.

CMIE चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास (CMIE Mahesh Vyas)यांनी PTI ला सांगितलं की, आगामी काळातही रोजगाराच्या अनुषंगानं स्थिती आव्हानात्मक राहिल. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात ७५ लाख जणांनी नोकऱ्या गमावल्या. त्यामुळे बेरोजगारीचा दर वाढला आहे.

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय बेरोजगारी दर ७.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागात हा दर ९.७८ टक्क्यांवर असून, ग्रामीण भागात तो ७.१३ टक्क्यांवर आहे. यापूर्वी मार्च महिन्यात राष्ट्रीय बेरोजगारी दर ६.५० टक्के होता. तसंच, ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांत बेरोजगारीचा दर कमीच होता.

'पहिल्या लॉकडाउनच्या वेळीबेरोजगारी दर २४ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्या तुलनेत सध्याची परिस्थिती वाईट नाही,' असंही व्यास यांनी स्पष्ट केलं.

कोविड-19 साथ(Covid19 Pandemic)आटोक्यात आली असं वाटत असतानाच अचानक या साथीने पुन्हा रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे स्थानिक पातळीवर लॉकडाउन किंवा कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय अनेक राज्य सरकारांनी घेतला. याचा अनेक उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आणि त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.



हेही वाचा

भारतीय रुपया लवकरच ७६ ची पातळी ओलांडेल

कार्यालयात कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यास काय आहे नियम, जाणून घ्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा