पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ८० रुपये प्रति लीटरच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर या नाराजीची दखल घेत केंद्र सरकारने मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी २ रुपये प्रति लीटरने कमी केल्यावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. यामुळे मुंबईतील पेट्रोलचे दर बुधवारी पहाटे ६ वाजेपासून प्रति लीटर ७९.९९ रु. वरून ७७.५१ रुपये, तर डिझेलचे दर प्रति लीटर ६२.८२ रु वरून ६०.४३ रुपयांवर आले आहेत.
हे दर आणखी कमी करण्याचे केंद्र सरकारने संकेत दिलेले आहेत. त्यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपापल्या राज्यातील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) कमी करण्याची विनंती करणार आहेत. ज्या राज्यांनी २५ ते ४९ टक्क्यांपर्यंत 'व्हॅट' आकारलेला आहे, अशा राज्यांना प्रामुख्याने ही विनंती करण्यात येणार आहे.
अर्थमंत्रालयाचे स्पष्टीकरण -
GOI reduces Basic Excise Duty rate on Petrol & Diesel by Rs.2 perlitre wef 4.10.17 to protect interest of commonman. https://t.co/IXTbCPedgE
— Ministry of Finance (@FinMinIndia) October 3, 2017
This decision has also been taken by the Government of India in order to protect the interest of common man.
— Ministry of Finance (@FinMinIndia) October 3, 2017
आंतरराष्ट्रीय बाजारात २०१४ नंतर कच्च्या तेलाची किंमत सातत्याने घसरली असली, तरी केंद्र सरकारने या काळात पेट्रोलवर १२६ टक्के, तर डिझेलवर ३७४ टक्के एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) वाढवली. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन स्वस्ताईचा सर्वसामान्यांना फायदा मिळालेला नाही. केंद्र सरकाकडून सध्या सरासरी २४.४८ रुपये प्रती लीटर उत्पादन शुल्क आकारले जाते.
मोदी सरकारच्या कार्यकाळात एक्साईज ड्युटीत ११ वेळा वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल २०१४ मध्ये अनब्रँडेड डिझेलवर ३.५६ रु. प्रति लीटर एक्साईज ड्युटी होती. त्यात ३८० वाढ होऊन ही किंमत १७.३३ रु, प्रति लीटरवर पोहोचली आहे. तर १ एप्रिल २०१४ मध्ये पेट्रोलवर ९.४८ रु. प्रति लीटर एक्साईज ड्युटी होती. त्यात १२० टक्के वाढ ती २१.४८ रु. प्रति लीटरवर पोहोचली आहे.
केंद्र सरकारने १६ जून २०१७ पासून इंधनाचे दर ठरवण्यासाठी नवीन फाॅर्म्युला तयार केला आहे. या फाॅर्म्युल्यानुसार तेल उत्पादक कंपन्यांना दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेऊन इंधनाच्या किमती ठरवतात.
उत्पादन खर्च + कर पेट्रोल डिझेल | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
क्रूड आईलचे आंतरराष्ट्रीय मूल्य | ५० रु. प्रति बॅरल | ५० रु. प्रति बॅरल |
प्रति लीटर क्रूड आईल | २०.१९ रु. | २०.१९ रु. |
---|---|---|
कंपनीला रिफायनरिंग आणि वाहतुकीसाठी येणारा खर्च | ९.३४ रु. प्रति लीटर | ८.९३ रु. प्रति लीटर |
रिफायनिंगनंतर प्रति लीटर क्रूड आईलची किंमत | २९.५३ रुपये प्रति लीटर | २९.१२ रु. प्रति लीटर |
---|---|---|
केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी | २१.४८ रु. प्रति लीटर | १७.३३ रु. प्रति लीटर |
डिलर कमिशन जोडून प्रति लीटर किंमत | ५४.२४ रु. प्रति लीटर | ४८.६२ रु. प्रति लीटर |
---|---|---|
व्हॅट जोडून प्रति लीटर किंमत | ६८.८८ रु. प्रति लीटर | ५७.६ रु. प्रति लीटर |
(पेट्रोल आणि डिझेलची किंमत ५० डॅलर प्रति बॅरल आणि १ डाॅलरची किंमत ६४.२० रुपयांच्या आधारे काढण्यात आली आहे. त्यात तफावत असू शकते.)
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)