कोल्डप्ले कॉन्सर्ट नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम इथे होणार आहे. जानेवारीमध्ये कॉन्सर्ट होणार असलेल्या ठिकाणाच्या 20 किलोमीटरच्या आत असलेली हॉटेल्स तीन रात्रींसाठी 5 लाखांपर्यंत शुल्क आकारत आहेत. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी देखील इतके आकारले जात नाही आहेत जितके केवळ या कॉन्सर्टसाठी आकारले जात आहेत.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमच्या परिसरातील बहुतेक हॉटेल्स आता 18, 19 आणि 21 जानेवारीसाठी पूर्णपणे बुक झाली आहेत.
उदाहरणार्थ, मेकमायट्रिपनुसार, ठिकाणाजवळील कोर्टयार्ड बाय मॅरियट आणि वाशी, नवी मुंबई येथील ताज विवांता इथे जागा हाऊसफुल झाल्या आहेत. Coldplay साठी भयंकर क्रेझ पाहायला मिळत आहे. BookMyShow वर उपलब्ध तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली.
वाशी येथील फॉर्च्यून सिलेक्ट एक्सोटिका, आयटीसी हॉटेल ग्रुपचा एक भाग, 17 ते 20 जानेवारी दरम्यान तीन रात्रींसाठी तीन लोकांसाठी एका खोलीसाठी 2.45 लाख आकारत आहे. तुर्भे येथील कार्यक्रमस्थळापासून काही किलोमीटर अंतरावर, फर्न रेसिडेन्सी तीन रात्रींसाठी दोन लोकांसाठी एका खोलीसाठी जवळपास 2 लाख आकारत आहे.
MakeMyTrip नुसार, Regenza by Tunga, वाशी, नवी मुंबईतील आणखी एक हॉटेल कॉन्सर्ट कालावधीत तीन रात्रींसाठी 4.45 लाख आकारत आहे.
हॉटेल एग्रीगेटर ॲप्सवर दाखवल्याप्रमाणे ही हॉटेल्स एका खोलीसाठी एका रात्रीसाठी सामान्यत: 7,000 आणि 30,000 दरम्यान शुल्क आकारतात. साधारण न्यू इयरला असे दर आकारले जातात. पण कोल्डप्ले पुढे ते दरही मागे पडले आहेत.
Agoda नुसार, मुंबईतील बांद्रा येथील ताज लँड्स एंड 17 जानेवारी रोजी एका रात्रीसाठी दोन जणांसाठी 34,000+ दर आकारत आहे. याउलट, हॉटेल 31 डिसेंबर रोजी एका रात्रीसाठी 32,000+ मध्ये रूम ऑफर करत आहे,
हेही वाचा