Advertisement

E-PAN Card मिळवा १० मिनिटात, 'अशी' आहे प्रक्रिया

तुमच्याकडे आधार कार्ड असल्यास तुम्हाला त्वरीत ऑनलाईन पॅन कार्ड (Online PAN Card) उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

E-PAN Card मिळवा १० मिनिटात, 'अशी' आहे प्रक्रिया
SHARES

नवीन पॅन कार्ड (PAN Card) मिळविण्यासाठी आपल्याला यापुढे दोन पानी अर्ज भरण्याची किंवा काही दिवस प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असल्यास तुम्हाला त्वरीत ऑनलाईन पॅन कार्ड (Online PAN Card) उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

ऑनलाईन पॅन कार्डसाठी  ई-पॅन कार्ड (E-PAN Card) अर्जात आपल्याला आपला आधार कार्ड (Aadhar card) नंबर नमूद करावा लागेल. यानंतर ई-केवायसी (e kyc) प्रक्रियेसाठी आपल्या लिंक केलेल्या मोबाइल (mobile) क्रमांकावर ओटीपी (otp) पाठविला जाईल. यानंतर १० मिनिटांत पीडीएफ स्वरुपात पॅन (pan) दिलं जाईल. आपण हा ई-पॅन डाउनलोड करू शकतो. तसंच तुमची इच्छा असेल तर तुम्ही फक्त ५० रुपयात रीप्रिंटची ऑर्डर देऊन लॅमिनेटेड पॅन कार्ड मिळवू शकता.

ऑनलाइन इन्स्टंट पॅनसाठी असा करा अर्ज

  • सर्व प्रथम आयकर विभागाच्या ई-फाईलिंग पोर्टलवर जा आणि डावीकडील Quick Links विभागात instant PAN through Aadhaar वर क्लिक करा.
  • आता नवीन पानावरील Get New PAN वर क्लिक करा.
  • आता नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी आपला आधार क्रमांक भरा.  यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करा. आता तुम्ही लिंक केलेल्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल. 
  • ओटीपी भरा आणि आधारची माहिती वैध करा.
  • पेन कार्ड अर्जासाठी तुमचा ई-मेल आयडी वैध करण्याचा पर्यायही तुम्हाला असेल.
  • आता आपल्या आधार क्रमांकाचा ई-केवायसी डेटा यूआयडीएआय बरोबर एक्सचेंज केला जाईल, त्यानंतर तुम्हाला इन्स्टंट ई-पॅन देण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेस १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही.
  • Check Status/ Download PAN वर आधार क्रमांक सबमिट करून आता तुम्ही पॅन पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करू शकता. जर तुमचा ई-मेल आयडी आधार डाटाबेसवर नोंदणीकृत असेल तर तुम्हाला ई-मेलवर पीडीएफ स्वरूपात पॅन पाठवलं जाईल.

ऑनलाइन इन्स्टंट पॅन कार्ड मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य, सोपी आणि पेपरलेस आहे. आपल्याला पोर्टलवर कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.तुमच्याकडे आधार कार्ड असल्यास तुम्हाला त्वरीत ऑनलाईन पॅन कार्ड (Online PAN Card) उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

पॅन कार्ड (pan card)  आधारशी जोडणे सरकारने बंधनकारक केले आहे. पॅनला आधारशी जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.



हेही वाचा -

२ पॅन कार्ड असल्यास भरावा लागेल 'इतका' दंड

Personal Loan चे 'ह्या' बँकांचे 'असे' आहेत व्याजदर

'ह्या' बँकांकडून मिळेल स्वस्त Education Loan




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा