Advertisement

पगार द्या, तेव्हाच हटू, जेट एअरवेजच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या

जोपर्यंत जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना थकीत पगार मिळत नाही आणि सेवा सुरू करण्याबाबत ठोस तोडगा निघत नाही, तोपर्यंत जागेवरून हटणार नाही, असं म्हणत जेट एअरवेजच्या हजारो कर्मचाऱ्यांनी जेटच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

पगार द्या, तेव्हाच हटू, जेट एअरवेजच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या
SHARES

जोपर्यंत जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना थकीत पगार मिळत नाही आणि सेवा सुरू करण्याबाबत ठोस तोडगा निघत नाही, तोपर्यंत जागेवरून हटणार नाही, असं म्हणत जेट एअरवेजच्या हजारो कर्मचाऱ्यांनी जेटच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

सेवा बंद

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजने बँकांकडे ४०० कोटी रुपयांची तात्काळ मदत मागितली होती. परंतु बँकांनी ही रक्कम देण्यास नकार दिल्याने जेट एअरवेजच्या संचालक मंडळाने बुधवार रात्री १२ वाजेपासून जेटची सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

निधी देण्यास नकार

दैनंदिन खर्च व कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी जेटला ४०० कोटी रुपयांचा निधी तातडीने हवा होता. त्यासंदर्भात कंपनीची आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या स्टेट बँकेच्या नेतृत्वातील बँकांचा समूह आणि जेट एअरवेजच्या प्रशासनात सोमवारी बैठक देखील झाली. मात्र कंपनीच्या हिश्श्याची खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगत बँकांनी हा निधी देण्यास नकार दिला.

परवाना संकटात

परिणामी विमानोड्डाणाचा परवाना वैध ठेवण्यासाठी आवश्यक असलेली किमान ५ विमाने सुरू ठेवण्याची तसदीही न घेता प्रशासनाने बुधवारी संपूर्ण विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.

कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

जेटचा हिस्सा विकत घेण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत. परंतु त्यासाठी १० मे पर्यंतचा वेळ लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत जेट एअरवेजमध्ये काम करणाऱ्या २३ हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर टांगती तलावार कायम असणार आहे. त्यामुळे थकीत पगार देण्याची मागणी करत हे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात गेले आहेत.

हेही वाचा-

अखेर जेटची सेवा बुधवारी रात्रीपासून बंद

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचं मुंबईत आंदोलन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा