Advertisement

पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकते, कारण...

येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकते

पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकते, कारण...
SHARES

येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकते, कारण कच्च्या तेलाच्या किमती ७ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८७ डॉलरच्या पुढे गेली आहे. यापूर्वी जानेवारी २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत ८७ डॉलरच्या वर गेल्या होत्या.

१ डिसेंबर २०२१ रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ ६८.८७ होती. जी आता प्रति बॅरल $ ८६ च्या वर पोहोचली आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती २६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी आणि चलन) अनुज गुप्ता म्हणतात की, आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 90 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे येत्या महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन ते तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्याबाबत सरकार आपली भूमिका नाकारू शकते, परंतु गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की निवडणुकीच्या काळात सरकार जनतेला खूश करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नाही. गेल्या काही वर्षांच्या ट्रेंडनुसार निवडणुकीच्या मौसमात जनतेला पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारनं ३ नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. दुसऱ्याच दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आणि अनेक राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. गेल्या ७५ दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, असं ट्रेंड दाखवतात. याच काळात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

आपण आपल्या गरजेच्या 85% पेक्षा जास्त कच्च्या तेलाची खरेदी बाहेरून करतो. त्याची किंमत आपल्याला डॉलरमध्ये मोजावी लागेल. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आणि डॉलरच्या मजबूतीमुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ लागतात.



हेही वाचा

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा