रेमंड लिमिटेडचे माजी संस्थापक डॉ. विजयपत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुलगा गौतम सिंघानिया आपल्याला सांभाळत नसल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर ते चर्चेत आले होते.
'टीओआय'ने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. विजयपत यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. ते अॉक्टूबरमध्ये 79 वर्षांचे होतील.
डॉ. सिंघानिया यांना गुरुवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना 48 तासापर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. हेमंत ठाकूर यांनी घेतला.
सिंघानिया यांनी कंपनीची सर्व सुत्रे मुलगा गौतमकडे सोपवून निवृत्ती स्वीकारली होती. पण कंपनीचा ताबा मिळताच गौतमने वडील विजयपत यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. घरासोबतच गौतमने त्यांच्याकडील गाडीही काढून घेतली. त्यामुळे ते अनेक दिवसांपासून दक्षिण मुंबईतील ग्रँड पराडी सोसायटीत एका भाड्याच्या घरात रहात आहेत.
हेही वाचा -
एकेकाळचे कोट्यधीश झाले बेघर, रेमंडचे विजयपत सिंघानियांची करूण अवस्था