अमेरिकेची प्रायव्हेट इक्विटी फर्म इक्विटी पार्टनर्सने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे डिजिटल प्लॅटफॉर्म जियोची 2.32 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. ११ हजार ३६७ कोटी रुपयांत हा करार झाला. ही गुंतवणूक जिओ प्लॅटफॉर्मच्या इक्विटी मूल्य ४.७१ लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझ मूल्य ५.१६ लाख कोटी रुपयांवर करण्यात आली आहे. एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. रिलायन्स जिओमध्ये भागीदारी घेणारी व्हिस्टा आता दुसरी मोठी कंपनी बनली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, एक महत्त्वाचा जोडीदार म्हणून व्हिस्टाचे स्वागत करुन मला आनंद होत आहे. ही जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञानी गुंतवणूकदारांपैकी एक आहे. आमच्या इतर भागीदारांप्रमाणे व्हिस्टादेखील आपल्याबरोबर समान दृष्टीकोन सामायिक करतो. सर्व भारतीयांच्या हितासाठी भारतीय डिजिटल इको सिस्टीम विकसित आणि कायापालट करण्याचा दृष्टिकोन आहे. तंत्रज्ञानाची परिवर्तनीय शक्ती ही सर्वांच्या चांगल्या भविष्याची गुरुकिल्ली आहे.
व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सकडे ५७ बिलियन डॉलर्सपेक्षा अधिकची भांडवली कमिटमेंट्स आहे. त्याचे जागतिक नेटवर्क हे जगातील पाचव्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी बनवते. सध्या व्हिस्टाची पोर्टफोलिओ कंपनी भारतात व्यवसाय करत असून त्यामध्ये १३ हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
हेही वाचा