Advertisement

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, 1 ठार, 2 जखमी

अपघातात ट्रक, टँकर आणि कार एकमेकांना धडकले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, 1 ठार, 2 जखमी
SHARES

मुंबई(mumbai)- पुणे(pune) द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटे तीन वाहनांची समोरासमोर धडक (multi-vehicle Collision) झाली. यात ट्रक उलटून कारचा चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातात ट्रक, टँकर आणि कार एकमेकांना धडकले. वाहने वेगात होती अशात ट्रक पलटी होऊन कारला चिरडल्याचे सांगण्यात येत आहे.

पनवेल (panvel) पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस, रुग्णवाहिका आणि इतर संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. 

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एक्सप्रेस वेच्या पुणे लेनवर हा अपघात झाला. आतापर्यंत, पोलिसांनी पीडितांची ओळख सांगितली नाही. घटनेची नेमकी वेळ स्पष्ट झालेली नाही. अजुनही चौकशी सुरू आहे.

16 जुलै रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) 54 जणांना घेऊन जाणारी बस ट्रॅक्टरला धडकली आणि खड्ड्यात पडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून 47 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली.



हेही वाचा

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबईतील सफाई कामगार हेच खरे हिरो : मुख्यमंत्री

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा