मुंबईतील गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर क्रमांक ३ या म्हाडा वसाहतीत एका घराचं बांधकाम सुरू असताना अपघात हाेऊन त्यात तिघांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं आहे.
मोतीलाल क्रमांक ३ मधील चाळ क्रमांक ६८ खोली क्रमांक ५३६ या घरावर दुमजली बांधकाम करण्यात येत हाेतं. लोखंडी चॅनल, कडप्पा आणि सिमेंट काँक्रीटच्या या लोड बेरिंगच्या बांधकामाचं वजन लोखंडी चॅनलला पेलता न आल्याने हा सगळा डोलारा आत काम करत असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळला. त्यात तिघांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या कामगारांना अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांकडून करण्यात आलं.
#Maharashtra: Death toll rises to 3 in the collapse of a portion of an under-construction building near Azad Maidan in Goregaon
— ANI (@ANI) December 23, 2018
#Maharashtra: 1 person dead, 8 injured in the collapse of a portion of an under-construction building near Azad Maidan in Goregaon; NDRF present at the spot pic.twitter.com/xLpls8xOER
— ANI (@ANI) December 23, 2018
या दुर्घटनेत श्रावण कुमार (२७), सुभाष चव्हाण (३३) आणि एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला असून मंगल बनसा (३५), मुन्ना शेख (३०) यांना सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर शिनू (३५), हरी वडार (३), शंकर पटेल(२१), सरोजा वडार(२४), रमेश निशाद (३२) जखमींना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे.