Advertisement

रेल्वे स्थानकांमध्ये ९,७७९ प्रवाशांच्या चाचण्या; १० प्रवाशांना कोरोनाची लागण

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापलिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्यांच्या संख्येत वाढ केली आहे.

रेल्वे स्थानकांमध्ये ९,७७९ प्रवाशांच्या चाचण्या; १० प्रवाशांना कोरोनाची लागण
SHARES

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापलिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्यांच्या संख्येत वाढ केली आहे. विशेष म्हणजे परराज्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या रेल्वे स्थानकांवरच करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, बुधवारी एकूण ६ रेल्वे स्थानकांवर ९ हजार ७७९ रेल्वे प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता मुंबई महापालिका आणखी वेगानं कार्यरत झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झालं आहे. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी इथं १ हजार ७९ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. मुंबई सेंट्रल इथं ३ हजार ४०० रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. दादर इथं २ हजार रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये केवळ एकाच प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

लोकमान्य टिळक टर्मिनस इथं ३१५ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ३ प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. वांद्रे टर्मिनस इथं २ हजार ४७ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ५ प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. बोरीवली इथं ९३८ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. इथं १ प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण ९ हजार ७७९ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि १० प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

Advertisement
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा