Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये आठवडाभरात ६३२ नवीन रुग्ण

मागील आठवडाभरापासून मीरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे.

मिरा-भाईंदरमध्ये आठवडाभरात ६३२ नवीन रुग्ण
SHARES

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी कोरोनाचे १३९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  मीरा-भाईंदरमधील कोरोना रुग्णांची संख्या आता १ ७ २९ वर गेली आहे. तर मृतांचा आकडा ८८ झाला आहे.

मागील आठवडाभरापासून मीरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. एका आठवड्यातच ६३२ नवीन रुग्ण आढळलं आहेत. लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये कोरोना रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढत गेली असल्याचं समोर आलं आहे. ८ जून रोजी येथील रुग्ण संख्या ही  १०२१ होती. मात्र, अवघ्या सात दिवसात १५ जून रोजीच्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या १६५३ वर गेली आहे. 

कोरोनाची तीव्रता लक्षात घेऊन मीरा-भाईंदर महानगरपालिकने २२ एप्रिलपासून या भागात संपूर्ण लॉकडाउन ठेवले. पण नंतर सवलत दिली गेली. मात्र, पुन्हा एकदा ३१  मे रोजी दुपारी १२ वाजेपासून या भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु आता इतर दुकानेही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

६ जून रोजी मीरा - भाईंदर महानगरपालिकेने  सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत इतर दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.  ८ जून ते १० जून या कालावधीत आणखी बरीच सूट देण्यात आली आहे. 



हेही वाचा -

'ही' आहे वसई, विरार, नालासोपाऱ्यातील १७ जूनपर्यंतची कंटेन्मेंट झोन लिस्ट

कोरोनाग्रस्तांसाठी एमएमआरडीएचं दुसरं कोविड सुविधा केंद्र




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा