Advertisement

मुंबईतील भूस्खलन रोखण्यासाठी 'इतका' खर्च करणार

जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीनंतर मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाने निधी मंजूर केला.

मुंबईतील भूस्खलन रोखण्यासाठी 'इतका' खर्च करणार
SHARES

मुंबई उपनगरातील 261 ठिकाणी भूस्खलन रोखण्यासाठी 57 कोटी रुपये खर्च करणार आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीनंतर मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाने (government) निधी मंजूर केला. मुंबई उपनगरीय पालकमंत्री आशिष शेलार (ashish shelar) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दरवर्षी भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्रांची ओळख पटवली आहे. या वर्षी, त्यांनी मुंबईतील 299 ठिकाणांची यादी केली आहे. त्यापैकी 261 उपनगरीय भागात (suburbs) आहेत. उर्वरित 38 मुंबई शहरात आहेत.

भूस्खलन (Landslide) प्रामुख्याने पावसाळ्यात होते. मुसळधार पावसामुळे खडक आणि माती पाणी रोखून धरण्यास असक्षम होतात ज्यामुळे भूस्खलन होते. अशा भागात झोपडपट्टी वस्त्या देखील आहेत, ज्यामुळे रहिवाशांसाठी धोका वाढतो.

भूतकाळात भूस्खलनामुळे मोठे नुकसान आणि जीवितहानी झाली आहे. 2000 आणि 2005 मध्ये घाटकोपर पूर्व आणि अंधेरी पूर्व येथे भूस्खलनाच्या घडल्या होत्या. यात जवळजवळ 70 जणांना आपला जीव गमवावा लागला.

मुंबईतील (mumbai) अनेक भाग भूस्खलनाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. यामध्ये असल्फा, चांदिवली, गिल्बर्ट हिल, चेंबूर (लाल डोंगर), साकी नाका, भांडुप पश्चिम, मुलुंड पश्चिम, घाटकोपर पश्चिम, अनुशक्ती नगर, कुर्ला आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील डोंगराळ प्रदेशांचा भाग आहे.

भूस्खलन रोखण्याव्यतिरिक्त, मुंबईच्या उपनगरीय भागांसाठी इतर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. सरकारने 2025-26 कालावधीसाठी 943 कोटी रुपये वाटप केले आहेत. पर्यटन विकासावर 30 कोटी रुपये खर्च केले जातील.

शिवाय, परवाने, प्रतिज्ञापत्रे आणि प्रमाणपत्रे यासारख्या सेवा लोकांना मिळण्यास मदत करण्यासाठी SETU म्हणून ओळखले जाणारे नागरिक सुविधा केंद्रे उघडण्याची सरकारची योजना आहे.



हेही वाचा

बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागात भरती

नवी मुंबईत 124 नवीन चार्जिंग स्टेशन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा