डोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीत आग लागली. या आगीमुळे अनेक इमारती, दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. ही आग पसरत असल्याने सुरक्षेच्या कारणात्सव आजूबाजूचा परिसर रिकामी करण्यात आला आहे. अमुदान केमिकल कंपनी, मेहता पेंट, के.जी.एन, केमिकल, सप्त वर्ण, हुंडाई शो रूम इत्यादी कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती प्राप्त समोर आली आहे.
कंपनीच्या बॉयलरचा स्फोट
प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवली परिसरातील एमआयडी फेज 2 मध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर अनेक इमारतींना हादरेही बसले आहेत. अनेक इमारतींच्या काचाही फुटल्या आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या एका कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाला आहे. अमुदान केमिकल कंपनी,मेहता पेंट,के.जी.एन, केमिकल,सप्त वर्ण ,हुंडाई शो रूम आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या स्फोटाची तीव्रता किती आहे, हा स्फोट नेमका कुठे झाला, त्याची कारण काय आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यात 40 जण जखमी आणि दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अद्याप समोर आली आहे.
"डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
"डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात यापूर्वीही अशाच भीषण स्फोट झाला होता. यात घराच्या काचाही फुटल्या होत्या. हा स्फोटही तसाच आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कंपन्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसावी, त्यामुळे हे स्फोट होत असावेत. हा सर्व प्रकार भयावह आहे. यावर योग्य ती काळजी घेतली जात नाही. कंपन्यांसह सर्वांनी ही काळजी घ्यायला हवी. ही आग कोणत्या प्रकारची आहे, यंत्रणा आग विझवण्यासाठी सक्षम आहे की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.", अशी माहिती ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांनी दिली.
हेही वाचा